उपराजधानीत एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा उजाडला तरी पोलिसांचा पगार झाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘मार्च एंडिंग’च्या धावपळीमुळे राज्यभरातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. त्यामुळे पोलिसांचे एकमेकांच्या उसनवारीवर काम सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा सुरू असून खात्यावर पगार जमा न झाल्याने पोलीस दलात अस्वस्थता वाढली आहे. साधारणपणे पोलिसांचे पगार हे १ किंवा २ तारखेपर्यंत होतात. त्यानुसार अनेक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आपल्या कर्जाच्या किंवा एलआयसीच्या हप्त्यांचे नियोजन केलेले असते. मात्र, एप्रिल महिन्याची ११ तारीख उजाडल्यानंतरही अजून पगार न झाल्याने पोलिसांना हप्ते भरता आले नाहीत. मार्चअखेरीस असणाऱ्या कामांमुळे पगार होण्यास उशीर झाला, अशी माहिती पोलीस विभागाकडून मिळत आहे. या प्रकरणी प्रतिक्रिया घेण्यासाठी पोलीस मुख्यालयाच्या पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.