नागपूर : जी-२० शिखर परिषदेदरम्यान राष्ट्रपती भवनात ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या रात्रीभोज निमंत्रण पत्रावरून वाद सुरू झाला आहे. यात ‘भारताचे राष्ट्रपती’ असा उल्लेख आहे. त्यावरून आता वादंग निर्माण झाला असून देशाचे नाव आता अधिकृतरित्या ‘इंडिया’ असे केले जाणार का? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी चार दिवसांपूर्वी गुवाहाटी येथे केलेले वक्तव्य आता चर्चेत येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. मोहन भागवत यांनी गुवाहाटी येथे सकल जैन समाजच्या एका कार्यक्रमात बोलताना  ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ या नावाचा वापर करण्याचे आवाहन केले होते. ते म्हणाले, या देशाचे नाव अनेक शतकापांसून भारत आहे, इंडिया नाही. त्यामुळे आपल्याला जुन्या नावाचा उपयोग करायला हवा.  आपल्या देशाचे नाव शतकांपासून  भारत आहे. भाषा कोणतीही असू द्या, नाव एकच असते. आपला देश भारत आहे आणि आम्हाला सर्व व्यवहारत इंडिया शब्द वापरणे बंद करून भारत शब्द उपयोगात आणणे सुरू करायला हवे. आम्हाला आमच्या देशाला भारत म्हणायला हवे आणि दुसऱ्यांना देखील हे समजावून सांगयला हवे, असे भागवत म्हणाले होते.त्यानंतर चार दिवसांनी जी-२० रात्रीभोज निमंत्रण पत्रात “प्रेसिझेंड ऑफ इंडिया” च्या ऐवजी ‘भारताचे राष्ट्रपती’ असे नमूद करण्यात आले आहे.