वर्धा : अनेक वर्षांपासून दिवाळी अंधारात काढणाऱ्या राज्यातील २८३ शिक्षकांच्या आयुष्यात यावर्षी दिवाळी प्रकाशमान होणार आहे. शालेय शिक्षण विभागाने उच्च माध्यमिक शाळेतील या शिक्षकांच्या समायोजनचा आदेश काढला आहे. शैक्षणिक वर्ष २००३ – ०४ ते २०१८ – १९ या कालावधीतल्या वाढीव पदांवरील हे शिक्षक आहेत. उपलब्ध पदानुसर आहे त्याच संस्थेत किंवा इतर संस्थेत त्यांचे समायोजन करण्याचे निर्देश विभागीय उपसंचालकांना देण्यात आले आहे.
हेही वाचा – मराठा आरक्षण : नागपूर जिल्ह्यात किती कागदपत्रांची तपासणी, काय आढळले ?
हेही वाचा – शरद पवारांवर आरोप करणाऱ्या नामदेवराव जाधवांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक, पोलिसांत तक्रार
हे शिक्षक यापूर्वी वाढीव पदावर कार्यरत असल्याने त्यांना शिक्षण सेवक योजनेतून सूट देण्यात यावी. तसेच समायोजन झाल्यावर त्यांची वेतन निश्चिती करीत नियमित वेतनश्रेणीत त्यांची नियुक्ती तारखेपासून सेवा गृहीत धरून करण्यात यावी. मात्र या शिक्षकांना त्यांनी यापूर्वी वाढीव पदावर केलेल्या सेवेस वेतन थकबाकी अथवा सेवानिवृत्ती वेतन व इतर कोणतेही लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.