जीर्ण झालेल्या अजनी रेल्वे उड्डाण पुलाच्या ठिकाणी केबल स्टेटेड पुल बांधण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ३२६ कोटी रुपये खर्च करून बांधला जाणारा हा पुल अशा प्रकारचा नागपुरातील दुसरा पुल असेल. पहिला पुल मुख्य रेल्वे स्थानकाजवळ ( राम झुला) आहे. विशेष म्हणजे नवा प्रस्तावित पुल हा फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात येतो.

हेही वाचा >>>गोंदिया : राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ऐवजी काँग्रेस सोडून जाणाऱ्यांना जोडावे – राधाकृष्ण विखे पाटील

मागील अनेक वर्षांपासून अजनी रेल्वे उड्डाण पुलाचा प्रश्न प्रलंबित आहे. विद्यमान पुल १९२७ मध्ये इंग्रजांनी बांधला होता.तो जीर्ण झाला आहे. त्यावरून जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. मध्ये कठडे लावल्याने रोज वाहतूक कोंडी होते. आता या पुलाला २२० मीटर लांबीच्या केबल स्पुटेटेड पुलात परावर्तित केले जाणार आहे. यामुळे या भागातील वाहतूक कोंडी दूर होईल. त्यावर ३२६ कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचे ट्वीट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.फडणवीस यांनी या संदर्भात मुंबईत अधिका-यांची बैठक घेतली. यात अजनीसह इतरही प्रलंबित उड्डाण पुलाच्या प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला.

Story img Loader