वर्धा: कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन नेणारे अट्टल ऐकले असतील, पण आता जप्त केलेला ट्रॅक्टर थेट तलाठी कार्यालयातून पळवून नेत धूम ठोकणारे सेलू तालुक्यात आढळून आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या भागात अवैध उत्खनन करीत मुरूम चोरी करण्याच्या घटना वाढत आहेत. एका घटनेत तलाठी अमोल रामटेके यांनी मुरुमाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर अडवून चौकशी केल्यावर त्यात चोरीचा मुरूम असल्याचे दिसून आले. त्यामुळे तो जप्त करून तलाठी कार्यालयात जमा करण्यात आला.

हेही वाचा… धक्कादायक! सिगारेटचे चटके देऊन प्रेयसीच्या मुलाचा अनन्वित छळ; विकृत प्रियकराला पोलीस कोठडी

पण पुढे हाच ट्रॅक्टर जमणी येथील सुरेंद्र दामाजी सातपुते याने पळवून नेला. ही घटना लक्षात येताच तलाठी रामटेके यांनी सुरेंद्र व विनोद बाबाराव सातपुते यांच्याविरोधात पोलीसांकडे तक्रार केली. गुन्हे दाखल झाले आहे. आता पोलीस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.