नागपूर: मराठा आरक्षणाच्या विषयावरून राज्यभर आंदोलने सुरू असताना आता मराठा विद्यार्थ्यांच्या परदेशी शिष्यवृत्तीबाबत गंभीर बाब समोर आली आहे. उच्चशिक्षणाकरिता परदेशात जाण्यासाठी सारथीमार्फत ७५ मराठा विद्यार्थ्यांना सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र, या योजनेला विविध प्रशासकीय कारणांनी होत असलेल्या विलंबामुळे यंदा मराठा विद्यार्थी परदेशात जाणारच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सुरुवातीला परदेशी शिष्यवृत्ती योजनेचा प्रस्ताव आठ महिने मंत्रालयात धुळखात होता, मग राज्यशासनाने परिपत्रक काढायला उशीर केला. त्यानंतर अर्ज प्रक्रियेसाठी सारथीने महिनाभराचा कालावधी घेतला. आता परदेशातील विद्यापीठे सुरू होऊन दोन महिने झालीत तरीही विद्यार्थी येथेच आहेत.

हेही वाचा… ‘शासन आपल्या दारी’ची उपलब्धी, पाच हजार कोटींची गुंतवणूक अन् यवतमाळला समृद्धी महामार्गाशी जोडण्याची घोषणा…

मुळातच उच्चशिक्षणास परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची अर्ज संख्या ७५ असून यासाठी केवळ ८५ अर्ज आलेत. शासनाने अर्जदारांना जाचक अटी लावल्याने केवळ ५० टक्के विद्यार्थी पात्र ठरले. मात्र, त्यांची निवड यादीही अद्याप जाहीर झालेली नाही. शासनाने सारथीच्या परदेशी शिष्यवृत्ती योजनेसाठी २५ कोटींची तरतूद केली. मात्र त्याचा लाभ केवळ २५ विद्यार्थीच घेऊ शकणार असल्याने २५ कोटींचा निधी पडून राहणार, असा आरोप स्टुडंट हेल्पींग हँडचे कुलदीप आंबेकर यांनी केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The selection list for foreign scholarship for maratha students has not been announced yet even though maratha reservation agitations across maharashtra dag 87 dvr
Show comments