बुलढाणा : मागील पावसाळ्यात धो धो बरसलेला पाऊस, सध्याही अधूनमधून हजेरी लावणारा अवकाळी पाऊस याउपरही जिल्ह्यात एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यातच पाणी टंचाईची तीव्रता वाढली आहे.कमी अधिक दोन लाख ग्रामस्थांची तहान कृत्रिम उपाय योजनांद्वारे भागविली जात आहे. यामुळे ग्रामीण राहिवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

जिल्ह्यातील तेरा पैकी बहुतेक तालुक्यातील गाव खेड्यातील तापमान ४० ते ४२ डिग्री सेल्सियस च्या दरम्यान पोहोचले आहे. मलकापूर, मोताळा, खामगाव, शेगाव, नांदुरा, जळगाव, संग्रामपूर या घाटाखालील उन्हाची तीव्रता जास्त आहे. यामुळे पावसाळ्यात कोसळधार पाऊस पडूनही आणि वेळोवेळी अवकाळी पावसाने हजेरी लावूनही एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यातच पाणी प्रश्न पेटल्याचे चित्र आहे. सध्या टँकरची संख्या कमी ( ६) असून बुलढाणा तालुक्यातील वरवंड, ढासाळवाडी, सावळी, हनवत खेड, पिंपरखेड आणि मेहकर तालुक्यातील वरवंड या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या गावांची लोकसंख्या १० हजाराच्या आसपास ( ९५८९) इतकी आहे. याशिवाय ५९ गावांना ६६ अधिग्रहित विहिरी द्वारे पाणी पुरविण्यात येत आहे.

हेही वाचा >>>नागपूर : जगातील सर्वात लहान चरखा, लांबी ३.२० मिमीची, सूतही काढता येतं

यातील मोठ्या गावासाठी अधिग्रहित विहिरींची संख्या जास्त आहे. या गावांची एकत्रित लोकसंख्या सुमारे पावणे दोन लाख इतकी आहे. यामुळे दोनेक लाख नागरिकांची तहान कृत्रिम उपाय योजनांद्वारे भागविली जात आहे. हा होणारा पाणीपुरवठा अपुरा असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

Story img Loader