नागपूर: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रसिध्दीसाठी उठसूठ शरद पवार यांच्यावर टीका करीत असतात. यापुढे पवारांवर बोलताना त्यांनी मर्यादा सांभाळल्या,अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार) प्रवक्ते वेदप्रकाश आर्य यांनी बावनकुळे यांच्यावर केली आहे.शरद पवार यांनी मराठा आरक्षणावर बोलू नये,अशी टीका बावनकुळे यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आर्य यांनी एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बावनकुळेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कोणाला बोलण्याचा अधिकार नाही हे समजून घ्यावे.फडणवीस २०१३ मध्ये भाजपा प्रदेश अध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी भाजप सत्तेवर आल्यास धनगर, मराठा, लिंगायत समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. पहिल्या कैबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देणार होते.त्याचे काय झाले. भाजपचे ९ वर्षापासून केंद्रात तर ७ वर्षापासून राज्यात सरकार आहे. मग बावनकुळे मराठा, लिंगायत, धनगर समाजाला आरक्षण का देत नाही. बावनकुळेंनी खोटं बोलणे थांबवावे व मर्यादेत राहून बोलावे, असे आर्य यांच्या पत्रात नमूद आहे.