वाशिम: ग्रामीण भागात अवैध दारू विक्री होत असून ती तत्काळ बंद करून महिलांचे उध्वस्त होणारे संसार वाचवावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या युवती जिल्हाप्रमुख प्रिया महाजन यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना लेखी निवेदनातून केली आहे. यावेळी उपजिल्हा प्रमुख रविता भवाल यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
जिल्ह्यातील अनेक भागात अवैध दारू विक्री खुलेआम केली जात आहे. यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असून याविरोधात महिलांनी अनेकदा पोलीस प्रशासन व तहसीलदार यांना निवेदने दिली. परंतु तरीही दारू विक्रेत्या विरोधात ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे.
हेही वाचा… पावसाच्या विश्रांतीचा सोयाबीनला
जिल्ह्यात काही दिवसांपासून अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. गावा गावात वरली, मटका, तितली भोवरा यासह अवैध दारू, गावठी दारू विक्री होत असल्याचा आरोप निवेदनातून केला जात आहे.
हेही वाचा… वीट भट्टीवर जन्मलेल्या बांबू कलावंतांचा संघर्ष सिनेमात
मानोरा तालुक्यातील कोंडोली येथे गावरान दारू चे प्रमाण वाढले असून याचा सर्वाधिक त्रास महिला, मुलींना सोसावा लागत आहे. महिलांचे संसार उध्वस्त होत आहेत. त्यामुळे तत्काळ याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.