महाविकास आघाडी सरकारने केलेली चूक दुरुस्त करत शिंदे-फडणवीस सरकारने २०११ च्या जनगणना व लोकसंख्येनुरूप महापालिका निवडणुकीसाठी सदस्यसंख्या निश्चित केली, असा दावा भाजप नेते व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला. नव्या सुधारणेसहच निवडणुका घ्याव्या, अशी मागणी त्यांनी केली.

नवीन जनगणना होण्यापूर्वी आघाडी सरकारने महापालिका आणि जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या वाढवली होती. तत्कालीन सरकारने नियमबाह्य पद्धतीने लोकसंख्येत ४ टक्के वाढ गृहीत धरली होती. त्यामुळे ही चूक दुरुस्त करून विद्यमान सरकारने नवीन निर्णय घेतला, असे बावनकुळे म्हणाले.
ओबीसीच्या राजकीय आरक्षणाबाबतचा अहवाल बांठिया आयोगाने तयार केला व तो राज्य सरकार व न्यायालयाने स्वीकारला आहे. त्यामुळे या मुद्यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बोलू नये, त्यांच्याच सरकारमुळे आरक्षणाला विलंब झाला हे त्यांनी मान्य करावे, असे बावनकुळे म्हणाले.

Story img Loader