भंडारा : दोन दिवसावर आलेल्या साखरपुड्यासाठी बॅग खरेदी करण्याकरिता भावासोबत दुचाकीवर गेलेल्या सीआरपीएफ जवान बहिणीचा अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपुलावर घडली. किरण सुखदेव आगाशे (२५) असे मृत तरुणीचे नाव आहे, तर लोकेश सुखदेव आगाशे (२१) रा. निलज खुर्द, ता. मोहाडी, असे जखमीचे नाव आहे. किरण मुंबई सीआरपीएफ कॅम्पमध्ये सेवेत होती. ती लोकेशसोबत तुमसर येथे बॅग खरेदीसाठी आली होती.

खरेदी करून दुचाकीने ते निलजकडे जात होते. देव्हाडी उड्डाणपुलावरून जाताना समोरून आलेल्या दुचाकीने कट मारल्याने दोघेही भाऊ-बहिण रस्त्यावर पडले. दरम्यान, मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकखाली किरणचे डोके चिरडले गेले आणि तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर भाऊ लोकेश गंभीर जखमी झाला. घटनास्थळावर रक्ताचा सडा पडला होता. किरणचाचा विवाह ठरल्याने ती आठ दिवसांपूर्वी गावी आली होती. दोन दिवसांनंतर तिचे साक्षगंध होते. अपघाताची माहिती मिळताच आई व वडिलांनी हंबरडा फोडला.

police ended controversy between mother and daughter both were reunited
पतीच्या निधनानंतर मुलीसाठी लग्न केले नाही, कष्ट उपसले, पण तरुण होताच मुलीने…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
husband sets car on fire wife dies
पत्नीला तिच्या मित्राबरोबर कारमध्ये पाहिलं, पतीने पाठलाग केला अन् पेट्रोल टाकून कार पेटवली, महिलेचा होरपळून मृत्यू
Delhi triple murder case update
तक्रारदार मुलगाच निघाला आई-वडील, बहिणीचा खुनी; संपत्तीसाठी २० वर्षीय मुलाचं धक्कादायक कृत्य
nargis fakhri first post after sister accused murder
बहिणीने एक्स बॉयफ्रेंडला मैत्रिणीसह जिवंत जाळल्याच्या आरोपानंतर नर्गिस फाखरीची पहिली पोस्ट; म्हणाली, “आम्ही तुमच्यासाठी…”
Pimpri, hitting with car, Pimpri car hit,
पिंपरी : मोटारीने धडक देऊन तरुणाला मारण्याचा प्रयत्न; बोनेटवरून…
Navari Mile Hitlarla
Video : “तुम्हाला लाज नाही वाटली?”, लीलाने फ्रॉड उघड करताच एजेने दोन्ही मुलांना खडसावलं; पाहा ‘नवरी मिळे हिटलरला’चा नवा प्रोमो
Epic Parenting Failure Girl Kicks Shelves Throws Products On Floor At Walmart Store Netizens React After
” वाईनच्या बाटल्या फेकल्या, वस्तू फेकल्या…मॉलमध्ये बेशिस्त चिमुकलीचा राडा!Viral Video पाहून तिच्या आई-वडीलांवर संतापले नेटकरी
Story img Loader