भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा व पक्षाच्या बैठकीसाठी आलेले माजी आमदार अतुल देशकर, जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती नागराज गेडाम यांच्यासह भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या पादत्राणावर चोरट्याने हात साफ केला. त्यामुळे भाजपाच्या या कार्यक्रमात पादत्राणे चोरट्याच्या प्रवेशाची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हेही वाचा- गोंदियातील बिरसी विमानतळ प्राधिकरणावर २.७ कोटींचा कर थकीत

Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण
Egg thrown at a Bengaluru BJP MLA Munirathna
BJP MLA Munirathna Naidu: बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर अंडी फेकली; तिघांना अटक

भारतीय जनता पक्षाच्या वतीने २१ व २२ जानेवारी रोजी जिल्हाभरात चित्रकला स्पर्धा आणि ‘परीक्षा पे चर्चा’ हा उपक्रम राबविण्यात आला. विशेष म्हणजे निःशुल्क असलेल्या या उपक्रमात जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येत विद्यार्थी सहभागी झाले होते. वेगवेगळ्या गटांसाठी घेण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी बक्षिसेही होती. त्यामुळे शाळा, महाविद्यालय, कॉन्व्हेंटमधील शेकडो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.

हेही वाचा- वर्धा : शेतात देहविक्रीचा व्यवसाय

स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी तालुकास्तरावर असलेल्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून उत्कृष्ट चित्र निवडून विजेत्या विद्यार्थ्यांची नावे पाठविण्याचे काम सुरू होते. ते काम पूर्ण झाले. मंगळवार २८ फेब्रुवारी रोजी श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात बक्षीस वितरण सोहळा आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजिली होती. बक्षीस वितरण सोहळ्यासाठी जिल्हाभरातून विजेते विद्यार्थी, कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते.

हेही वाचा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विश्वासू आमदार विप्लव बाजोरिया आहेत तरी कोण? जाणून घ्या…

सभागृहाबाहेर अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आपले जोडे, चप्पला बाहेर काढल्या होत्या. बक्षीस वितरण सोहळ्यात सगळे व्यस्त असतानाच काही पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे जोडे, चप्पलावर चोरट्यांनी डाव साधला. ब्रम्हपुरीचे माजी आमदार अतुल देशकर, माजी सभापती नागराज गेडाम यांच्यासह अनेकांना कार्यक्रम आटोपून सभागृहाबाहेर आल्यानंतर त्यांचे जोडे, चप्पल दिसल्याच नाही. बरीच शोधाशोध करूनही ते दिसत नसल्याचे पाहून अनेकांनी दुकाने गाठत चप्पल, जोडे विकत घेतले. आता या पादत्राणे चोरट्याची भाजपाच्या वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे.

Story img Loader