नागपूर : सरडा रंग बदलतो, हे साऱ्यांनाच ठाऊक आहे, पण त्याचे रंग बदलणे हे वेगळे. प्राण्यांमध्येही शरीरातील रंगद्रव्य कमीअधिक झाले तर काही प्राणी पूर्णपणे पांढरे, तर काही पूर्णपणे काळे असतात. या नागाची मात्र बातच न्यारी. तो चक्क अर्धा पांढरा निघाला. नागपुरातील लेडीज क्लब येथे हा पांढरा नाग निघाला आणि क्लब मध्ये एकच धावपळ उडाली.

सर्पमित्र आनंद शेळके तेथे पोहचले आणि त्यांनी नाग प्रजातीचा अर्धा पांढरा असलेला (Leucistic Cobra) रेस्क्यू केला. आनंद शेळके याच्या सोबत सर्पमित्र साहिल शरणागत होते. असल्या प्रकारचे साप कधी कधी आढळतात आनंद शेळके यांनी हा साप ट्रान्झिट ट्रीटमेंट सेन्टर ला आणला. तेथे त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल.

Story img Loader