नागपूर : प्रेम हे प्रेम असतं. प्रेमात जात-पात, वय, नातं आणि सीमेचे बंधन नसतं. परंतु, सख्ख्या मुलीच्या घरी पाहुणी म्हणून आलेल्या सासूवर जावयाचा जीव जडला. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. सासूनेही मुलीच्या संसाराचा विचार न करता स्वतःच जावयासह नव्याने संसार थाटला. त्यामुळे पत्नीने पती आणि आईविरुद्ध भरोसा सेलमध्ये धाव घेतली.

गिट्टीखदानमध्ये राहणारी महिला सुजाता (बदललेले नाव) हिच्या पतीचे लग्नाच्या तिसऱ्याच वर्षी निधन झाले. पतीच्या निधनानंतर काही महिन्यांच्या चिमुकल्या मुलीसह ती माहेरी आली. ती खासगी नोकरी करीत वृद्ध आई आणि मुलीसह राहते. मुलगी मोठी झाल्यानंतर सुजाता हिने नातेवाईकांच्या मदतीने मुलीच्या लग्नासाठी स्थळ बघितले. मुलीपेक्षा वयाने १२ वर्षांनी मोठ्या युवकाशी मुलीचे लग्न जुळवले.

Arjun Bijlanis Wife Neha Swami make 14 kg Weight Loss
Arjun Bijlani’s Wife : पत्नी नेहा स्वामीने १४ किलो वजन कसे कमी केले? अर्जुन बिजलानीने सांगितले सीक्रेट; म्हणाला, “तुम्ही तुमच्या जोडीदारावर प्रेम करत असाल…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Marathi actress Vishakha Subhedar statement talking about divorce
“लग्नसंस्था आता आपण समाजानेचं मोडीत काढल्यात…”, घटस्फोटाबाबत बोलताना विशाखा सुभेदारचं वक्तव्य, म्हणाली…
Star Pravah New Serial Lagnanantar Hoilach Prem
लग्नानंतर होईलच प्रेम : नव्या मालिकेची संपूर्ण स्टारकास्ट माहितीये का? मृणाल दुसानिस अन् ज्ञानदाच्या भूमिकेविषयी जाणून घ्या…
Gym trainer ends life over dispute with boyfriend send video to mother don't leave him shocking Photo
PHOTO: सॉरी मम्मी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडून चूक केली…त्याला सोडू नको” आईला शेवटचा मॅसेज करुन संपवलं आयुष्य
Isha Koppikar first reaction on divorce with Timmy Narang
१४ वर्षांचा संसार मोडण्याचं कारण काय? पहिल्यांदाच बोलली ‘खल्लास गर्ल’; म्हणाली, “त्याने अत्यंत बेजबाबदारपणे…”

हेही वाचा – नागपूरवर आता संसर्गजन्य आजारांचे सावट! ‘या’ रोग आजाराचा सर्वाधिक धोका

मुलीचा सुखाने संसार सुरु झाला तर ती वृद्ध आईसह राहत होती. मुलगी तीन महिन्यांची गर्भवती असल्यामुळे मदतीसाठी आई मुलीच्या घरी आली. यादरम्यान ४२ वर्षीय सासूवर जावई विनोद (३५) याचा जीव जडला. गर्भवती पत्नीची सेवा सोडून विनोदने सासूशी जवळीक साधली. विधवा असलेल्या सासूनेही जावई या नात्याचा विचार न करता प्रेमसंबंध प्रस्थापित केले. पती आणि आईच्या प्रेमसंबंधाबाबत मुलीला कोणतीही कल्पना नव्हती. मुलीला बा‌ळ झाले. सुजाताने जावई, नात आणि मुलीला स्वतःच्या घरी नेले. तेव्हापासून जावई-सासूचे प्रेमसंबंध वाढले.

पती आणि आईची जवळीक मुलीला खटकली. एकेदिवशी पती आणि आई दार बंद करून खोलीत दिसले. मुलीचा पारा चढला. तिने पतीची समजूत घातली. मात्र, पती आणि आईने तिला प्रेमसंबंध असून आम्हाला वेगळे राहायचे आहे, असे सांगितले. त्यामुळे तिला धक्काच बसला. सासू-जावयाने भाड्याने खोली केली आणि नव्याने संसार थाटला. सख्ख्या आईनेच संसार उद्धवस्त केल्याने ती हतबल झाली. नातेवाईकांनीसुद्धा दोघांचीही समजूत घातली. परंतु, उपयोग झाला नाही.

हेही वाचा – “…तर मध्य, पूर्व नागपूर पुरात बुडाले असते”, असा दावा का केला जातो?

मुलीने भरोसा सेलमध्ये घेतली धाव

गेल्या वर्षभरापासून आई आणि पतीने वेगळा संसार थाटला. तर मुलगी आजी आणि चिमुकलीसह राहते. नातेवाईकांकडून तोडगा काढून बघितल्यानंतरही दोघेही एकमेकांचा साथ सोडायला तयार नव्हते. शेवटी मुलीने पती व आईच्या विरुद्ध भरोसा सेलमध्ये धाव घेतली. पोलीस निरीक्षक सीमा सूर्वे यांनी प्रकरण समजून घेतले. सासू आणि जावयाला बोलवून घेतले. दोघांचीही समजूत घातली. मुलीचा संसार तोडून मुलाच्या वयाच्या जावयाबरोबरच्या स्वतःच्या संसाराचा मोह सोडण्यासाठी प्रवृत्त केले. शेवटी जावई-सासू यांनी चूक कबुल केली. पत्नी व चिमुकल्या मुलीसह तो घरी परतला, तर सासू पुन्हा वृद्ध आईसह आपल्या घरी राहायला गेली.