गोंदिया : ‘खून का बदला खून’ ही म्हण आपण चित्रपटात ऐकतो, अशाच एखाद्या चित्रपटातील कथानकाप्रमाणे वास्तवात एक घटना गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत घडली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
या घटनेत ३० वर्षांपूर्वी वडिलांचा खून करणाऱ्या व्यक्तीच्या मागावर राहून रहस्यमयरित्या खून करण्यात आला. त्यानंतर हा खून अपघात असल्याचे भासविण्याचे कृत्यही आरोपींनी केले. परंतु गोंदिया पोलीस दलातील, स्थानिक गुन्हे शाखा, नक्षल सेल व गोंदिया ग्रामीण अश्या प्रकारे तीन पथक तयार करून मृताची स्थिती, घटनास्थळावरील भौतिक पुरावे व शेजारील आढललेले सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यावर फुलचूरटोला ते पिंडेकपार या रस्त्यावर झालेला अपघात हा अपघात नसून खून असल्याचे स्पष्ट झाले. गोंदिया ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात सुनील भोंगाडे व शाहरुख शेख या दोघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, २८ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ ते ६:३० वाजेदरम्यान गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या फुलचुरटोला ते पिंडकेपार रस्त्यावर एका दुचाकीचा अपघात झाला होता. या अपघातामध्ये मोरेश्वर खोब्रागडे (रा. चंद्रशेखर वॉर्ड, श्रीनगर गोंदिया) यांचा मृत्यू झाला. मात्र, हा अपघात संशयास्पद असल्याने खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी आक्षेप घेत पोलिसांकडे तक्रार केली होती. यावरून गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा छडा लावून सत्यता पडताळून गुन्ह्याचा उलगडा पोलिसांनी केला. त्यात हा अपघात नसून खून असल्याचे स्पष्ट झाले. आरोपी सुनील भोंगाडे याच्या वडिलांचा खून ३० वर्षांपूर्वी झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी सुनील हा आठ दिवसांपासून मोरेश्वर खोब्रागडे यांच्या मागावर होता. संधी मिळताच त्याने खोब्रागडे यांची हत्या केली आणि अपघाताचा बनाव रचल्याचं पोलीस तपासात समोर आलं.
हेही वाचा – नागपूर : नमो महारोजगार मेळावा आज, नोंदणीसाठी ५० स्टॉल्स
पोलिसांनी या प्रकरणात १०० ते १५० च्यावर सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी आणि तांत्रिक विश्लेषणाची खात्री करून आरोपी सुनील धनिराम भोंगाडे (४४, रा. शास्त्री वॉर्ड गोंदिया) व त्याच्या दुकानात काम करणारा साथीदार आरोपी शाहरूख हमीद शेख (२४, रा. कुऱ्हाडी) यांना अटक केली. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.