नागपूर उपराजधानीतील ज्येष्ठ कवी राजा बढे यांच्या ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्य गीताचा दर्जा दिला जाणार असल्याने या निमित्ताने विदर्भाचा सन्मान वाढणार आहे.
हेही वाचा >>>नागपूर : महिलेशी मैत्री करून तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार
संपादक, अभिनेते, गद्य लेखक, नाटककार, कादंबरीकार, मराठी कवी आणि गीतकार अशी राजा बढे यांची ओळख होती.त्यांचा जन्म नागपुरात, प्राथमिक शिक्षण छिंदवाडा येथे तर माध्यमिक शिक्षण नागपूरच्या टिळक विद्यालयात झाले. १९३५ मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. नंतर ते वर्षभर नागपूरच्या दैनिक महाराष्ट्रमध्ये सहसंपादक आणि त्याच वेळी वागीश्वरी मासिकाच्या संपादक मंडळात होते.. १९५६ ते १९६२ या कालखंडात ते आकाशवाणीत निर्माता’ म्हणून काम केले. १९४० च्या आसपास चित्रपट व्यवसायात प्रवेश केला. ‘सिरको फिल्म्स’ मध्ये दोन वर्षे त्यांनी कामे केली. १९४२ मध्ये ते ’प्रकाश स्टुडिओ’त रुजू झाले. बंधू बबनराव यांच्या मदतीने त्यांनी “स्वानंद चित्र’ ही संस्था उभी केली आणि ’रायगडचा राजबंदी’ हा संभाजी महाराजांच्या जीवनावरील चित्रपटाची निर्मिती केली.
हेही वाचा >>>रानटी हत्तींमुळे घर सोडायची आली वेळ, गोंदियाच्या नागणडोह गावातील १२ कुटुंब झाले विस्थापित
नागपुराती महाल परिसरात त्यांचे निवासस्थान होते. महापालिकेने तेथे स्मारक बांधले. या स्मारकाच्या माध्यमातून त्यांची स्मृती जपली जात आहे. त्यांच्या साहित्य संपदेमध्ये अठरा काव्यसंग्रह, चार नाटके, नऊ संगितीका, पाच एकांकिका, एक कांदबरीचा समावेश आहे. ७ एप्रिल १९७७ मध्ये राजा बढे यांनी अखेरचा निरोप घेतला.