नागपूर: राज्यातील विद्यार्थिनींना सायबर सुरक्षित करण्यासाठी राज्य महिला आयोगाने ‘मिशन ई सुरक्षा’ उपक्रम हाती घेतला असून गुरूवारी १४ डिसेंबरला वनामती सभागृहात आयोजित कार्यक्रमात या उपक्रमाची सुरूवात होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विविध महाविद्यालयातील ५०० विद्यार्थी यात सहभागी होणार असून मेटाचे तज्ञ त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

सध्या इंटरनेट हे दुधारी अस्त्र आहे. त्याचे अनेक फायदे असले तरी काही चुकीच्या प्रवृत्तींमुळे मोठ्या प्रमाणात यात फसवणूकही होत आहे. विद्यार्थ्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून होणारे गैरप्रकार टाळण्याकरिता तसेच भविष्यात सायबर सुरक्षित होण्याकरिता ‘मिशन ई सुरक्षा’ राबवण्यात येणार आहे. मुलींनी सायबर सुरक्षित होण्याकरिता घ्यावयाची काळजी, कायद्यातील तरतूदी, यंत्रणांची मदत याबाबत या कार्यक्रमात माहिती देण्यात येणार आहे.

हेही वाचा… ‘लाव रे तो व्हिडीओ’च्या प्रयोगाने देशमुखांचा फडणवीस यांच्यावर हल्ला

उपक्रमाबाबत बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, महाविद्यालयीन मुली सायबर फसवणुकीला बळी पडल्याच्या अनेक तक्रारी आयोगाकडे राज्यभरातून येत असतात. कुठे दाद मागावी हे न कळल्याने मुली याबाबत वाच्यता करीत नाही. अशा प्रसंगात कोणती काळजी काळजी घ्यावी, मदतीसाठी कुठे संपर्क साधावा याबाबतची माहिती मुलींपर्यंत पोहोचावी यासाठी आयोगाने ‘मिशन ई-सुरक्षा’ उपक्रम हाती घेतला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The state womens commission has undertaken the initiative mission e suraksha to make the female students of the maharashtra cyber secure nagpur cwb 76 dvr