गोंदिया : गडचिरोली जिल्ह्यातील जंगलातून गोंदिया जिल्ह्यात दाखल झालेल्या रानटी हत्तीच्या कळपाने गेल्या पाच दिवसांपासून अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कालीमाती, बोळदे परिसरातील शिवारात मुक्काम ठोकला आहे. परिणामी, या परिसरातील शेतकऱ्यांच्या काळजीत भर पडली असून हत्तीच्या कळपाच्या दहशतीखाली या परिसरातील शेतकरी असल्याचे चित्र आहे.

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कवठा बोळदे, बाराभाटी, नवेगावबांध, केशोरी, रामपायली, इटियाडोह या परिसरात गेल्या पाच दिवसांपासून रानटी हत्तीच्या कळपाने मोठ्या शेतशिवारात धुमाकूळ घालून धान पिकांचे नुकसान केले. दोन-तीन घरांची आणि धान्याची मोठ्या प्रमाणात नासधूस केल्याने योगेश्वर उईके यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. दोन दिवसांपूर्वी हत्तीच्या कळपाने या परिसरात धुमाकूळ घातल्यानंतर गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलाच्या दिशेने धाव घेतली होती. त्यामुळे हे हत्ती गडचिरोली जिल्ह्यात परत जातील, अशी शक्यता वर्तविली जात होती. पण हत्तीच्या कळपाने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कालीमाती, कवठा बोळदे परिसरातील शेतशिवारातच मुक्काम ठोकला आहे. या रानटी हत्तीच्या कळपावर वनविभागाचे पथक नजर ठेवून आहे. तसेच ड्रोनच्या मदतीने हत्तीच्या कळपाचे लोकेशन सातत्याने ट्रेस केले जात आहे.

elephant loksatta news
बेळगांव खानापूरमध्ये हत्ती पकड मोहीम, तर महाराष्ट्रात दोडामार्ग-चंदगड तालुक्यात हत्तींचा धुमाकूळ
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
buldhana couple murder loksatta news
बुलढाणा : नातेवाईकांच्या भेटी घेतल्या, पण निरोप घेतला तो कायमचा; वृद्ध दाम्पत्याचा…
monolith monuments found in kumbhavade village,
राजापूरातील कुंभवडे येथे जांभ्या दगडात आढळली सात एकाश्मस्तंभ स्मारके
Bed Sheet production in Solapur
सोलापूरच्या चादर व्यवसायाचे पानिपत!
Foreign varieties on the root of Shrivardhan Rotha betel nut
परराज्यातील वाण श्रीवर्धनच्या रोठा सुपारीच्या मुळावर?
Dadar-Ratnagiri Railway , Konkan , train to UP,
दादर-रत्नागिरी सुरू करण्यासाठी प्रवासी एकवटले, कोकणात जाणारी गाडी बंद करून यूपीची गाडी
Nitin Gadkari statement regarding tribal ministers Nagpur news
आदिवासी मंत्र्यांना मीच राजकारणात आणले, गडकरींनी सांगितला किस्सा

हेही वाचा – कंपनी व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे स्फोट, वडेट्टीवारांची मृतांच्या परिवारासाठी ५० लाखांच्या मदतीची मागणी

रविवारी सकाळी या हत्तीच्या कळपाचे लोकेशन हे कालीमाती शेतशिवारात आढळल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे वन विभागाच्या आठ-दहा कर्मचाऱ्यांची चमू आणि एक विशेष पथक याच परिसरात तैनात करण्यात आले आहे. हे पथक हत्तीच्या कळपाचे लोकेशन घेऊन परिसरातील गावकऱ्यांना सजग राहण्याच्या सूचना देत आहेत. हत्तीच्या कळपाचा मुक्काम या परिसरात वाढल्याने शेतकऱ्यांची काळजी मात्र वाढली आहे.

मळणीची कामे आटोपण्याचा प्रयत्न

रानटी हत्तींच्या कळपाने शेतातील धानाच्या पुंजण्यांना टार्गेट केले आहे. हा कळप शेतशिवारात धुमाकूळ घालून धानाचे नुकसान करीत आहे. या भीतीने शेतकरी आता धानाच्या मळणीची कामे लवकरात लवकर आटोपण्याचा प्रयत्न करीत आहे. शिवाय शेतीची कामेही दुपारी चार वाजतापर्यंत करून शेतकरी घराकडे परतत आहे.

हेही वाचा – छगन भुजबळ म्हणतात, “मनोज जरांगेंच्या नादी लागणार नाही, मात्र टीका केली तर…”

नुकसानीचे पंचनामे सुरू

रानटी हत्तीच्या कळपाने मागील पाच दिवसांपासून अर्जुनी मोरगाव तालुक्यातील चार ते पाच गावातील शेतशिवारात धुमाकूळ घालून धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या नुकसानीचे वनविभागाचे कर्मचारी पंचनामे करीत आहे. हत्तीच्या कळपाने किती हेक्टरमधील पिकांचे नुकसान केले याचा अहवाल सोमवारी येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader