वर्धा : कोविड संक्रमण काळात रेल्वे प्रशासनाने देशभरातील वाहतूक बंद केली होती.कालांतराने टप्प्याट्प्याने रेल्वे थांबे सुरू झाले. मात्र अद्याप सर्वच थांबे सुरू न झाल्याने प्रवाश्यांना अडचणी येत आहे. या बाबत वारंवार पाठपुरावा करणारे खासदार रामदास तडस यांनी रेल्वे मंत्री आश्विन वैष्णव यांची भेट घेवून थांबे सुरू करण्याची मागणी केली.

त्यावर सकारात्मक प्रतिसाद देताना मंत्र्यांनी चांदूर रेल्वे व हिंगणघाट येथील काही गाड्यांचे थांबे पूर्ववत सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले. नागपूर मुंबई नंदीग्राम एक्सप्रेसचे थांबे सुरू होणार आहे. हिंगणघाट येथे कोविड पूर्व काळात सतरा थांबे होते.आता फक्त चारच गाड्यांचे आहेत.उर्वरित लवकरच सुरू करण्याची खात्री वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित असलेल्या या भेटीत देण्यात आल्याचे तडस यांनी सांगितले.हिंगणघाट ते चांदूर या टप्प्यातील विविध स्थानकांवर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचे सहाशेवर थांबे अद्याप बंद आहेत. ही स्थिती पूर्वपदावर येण्यास थोडा वेळ लागणार असल्याचे या बैठकीत स्पष्ट झाले.

Story img Loader