नागपूर : Kuno National Park मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात शुक्रवारी ‘सुरज’ नावाच्या चित्त्याचा मृत्यू झाला. अवघ्या आठ दिवसात झालेला हा दुसरा मृत्यू आहे. आतापर्यंत आठ चित्ते मृत्युमुखी पडले आहेत. भारतात एकीकडे ‘चांद्रयान ३’ मोहिमेचे यश साजरे केले जात असताना चित्ता प्रकल्पाचे अपयश मात्र ठळकपणे समोर येत आहे. आफ्रिकेतून स्थलांतरित करण्यात आलेल्या ‘सूरज’ या चित्त्याचा शुक्रवारी मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात मृत्यू झाला. मार्च २०२३ पासून सुरू झालेले चित्त्यांचे मृत्यूसत्र अजूनही सुरूच आहे. आतापर्यंत आठ चित्ते मृत्युमुखी पडलेत. तीन दिवसांपूर्वी ‘तेजस’ या चित्त्याचा मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी कुनो उद्यानातील आठव्या चित्त्याच्या मृत्यूबद्दल केंद्राची खरडपट्टी काढली आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतरही राजकीय प्रतिष्ठा जपण्यासाठी या चित्त्यांना इतर राष्ट्रीय उद्यानात स्थलांतरित करु दिले जात नाही. परिणामी, या उद्यानात चित्त्यांच्या मृत्यूची मालिका सुरूच आहे. ‘चांद्रयान-३’ च्या प्रक्षेपणामुळे आजचा दिवस आनंदाचा असायला हवा होता, पण आठव्या चित्त्याच्या मृत्युने त्यावर या आनंदावर विरजन घातले. किमान आतातरी राजकीय प्रतिष्ठेपेक्षा संरक्षणाला अधिक महत्त्व दिले जाईल, अशी अपेक्षा रमेश यांनी व्यक्त केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The suraj cheetah dies in kuno national park ysh
Show comments