चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील शेगाव येथील चार युवकांचा सेल्फी काढण्याच्या नादात घोडझरी तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवार १६ जुलै चे सायंकाळी ४.३० वाजताची आहे. मृतकांमध्ये मनीष श्रीरामे (२६), धीरज झाडें (२७), संकेत मोडक (२५), चेतन मांदाडे (१७) यांचा समावेश आहे. शेगाव येथील आठ युवक रविवारी पार्टीसाठी घोडझारी तलाव येथे आले होते. घोडाझरी तलाव परिसरात फिरल्यानंतर सेल्फी काढण्याच्या नादात एक जण घसरून पडला त्याचे पाठोपाठ तीन जण पडले. सोबतच्या चार सहकाऱ्यांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पावसामुळे घोडझरीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे त्यांचा पत्ता लागला नाही. सध्या शोध सुरु असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
चंद्रपूर : सेल्फी काढण्याच्या नाद भोवला; चार युवक बुडाले, शोध मोहीम सुरू..
वरोरा तालुक्यातील शेगाव येथील चार युवकांचा सेल्फी काढण्याच्या नादात घोडझरी तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवार १६ जुलै चे सायंकाळी ४.३० वाजताची आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
![cop drowned in farm pond](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/06/Drowned-death-2.jpg?w=1024)
First published on: 16-07-2023 at 18:01 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The taking selfies four youths drowned in ghodzari lake chandrapur rsj 74 ysh