नागपूर : अयोध्येला उद्या सोमवारी प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असताना देशभर हा उत्सव साजरा केला जात आहे. नागपुरात एका शाळेतील विद्यार्थी नृत्य करत असताना त्या शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थ्यांसोबत ‘भारत का बच्चा बच्चा’ या गाण्यावर जबरदस्त नृत्य केले. या नृत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून याची सर्वत्र चर्चा आहे.
अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण आणि प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. रामभक्तांकडून वेगवेगळ्या पद्धतीने आनंद व्यक्त केला जातो आहे. त्यामुळे शहरातील रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शनिवारी सकाळी शहरातील विविध भागांतील शाळेने प्रभू राम नामाचा गजर करत मिरवणूक काढल्या तर काही शाळांमध्ये या उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. शाळेतील हजारो मुले यात सहभागी होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये या उत्सवाचा उत्साह असताना आणि डीजेवर प्रभू रामचंद्राची भजने वाजविली जात आहे.
हेही वाचा – विदर्भात पावसाच्या सरी, हवामान खात्यानेही दिला इशारा
नागपूरच्या बाबा नानक हायस्कूलचे विद्यार्थी राम धूनवर नृत्य करत असताना शाळेतील एका शिक्षिकेनेसुद्धा मुलांबरोबर ताल धरत तल्लीन होऊन नृत्य केले. या नृत्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असताना याची चांगलीच चर्चा आहे.