‘यू-ट्युब’ बघून प्रयोग करण्याचा उपद्व्याप एका विद्यार्थ्याच्या जीवावर बेतला. सर्वात वेगात धावणारे वाहनाचे संशोधन करण्याच्या नादात तयार केलेल्या वाहनातील पेट्रोलचा भडका उडाल्याने प्रयोग करणाऱ्या विद्यार्थ्याचा जळून मृत्यू झाला.

हेही वाचा – नागपूर : कर्ज फेडण्यासाठी केली मित्राच्या घरी चोरी

ही घटना गिट्टीखदान परिसरात उघडकीस आली. गौरव प्रमोद डाखोडे (२०, कोलबा स्वामीनगर, हजारी पहाड) असे मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद डाखोडे हे केंद्र सरकारच्या तपास यंत्रणेशी संबंधीत विभागात नोकरीवर आहेत. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे.

हेही वाचा – चंद्रपूर : …अन् वाघांची जोडगोळी आली रस्त्यावर ; नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

मुलगा गौरव हा ‘एसएफएस’ महाविद्यालयात ‘बीसीए’ अभ्यासक्रमाचा द्वितीय वर्षांचा विद्यार्थी होता. त्याला महाविद्यालयाचा प्रोजेक्ट तयार करायचा होता. त्यामुळे त्याने १६ ऑगस्टला दुपारी तीन वाजता प्रोजेक्ट तयार करण्याचे काही सामान आणि पेट्रोल आणले. प्रोजेक्ट तयार करताना पेट्रोलमुळे स्फोट झाला. या स्फोटात गौरव हा गंभीररित्या भाजला. त्याला धंतोलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा १९ ऑगस्टला त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

गौरव याला ‘यू-ट्युब’वरून काहीतरी शिकण्याचा, नवसंशोधन करण्याचा आणि वस्तू बनवण्याचा छंद होता. त्याला पेट्रोलचा वापर करून ज्वाला तयार करणारे किंवा स्फोट होऊन आवाज निर्माण करणारे वाहन तयार करायचे होते. ते वाहन सर्वात वेगात धावेल, असे संशोधन त्याला करायचे होते. मात्र, ते वाहन तयार करताना पेट्रोलचा स्फोट झाल्याने गौरवचा जळून मृत्यू झाल्याची उलट-सुलट चर्चा परिसरात होती. या घटनेमागील नेमक्या कारणाचा तपास पोलीस करीत आहेत.

Story img Loader