अकोला : सध्या रोजगाराची मोठी समस्या निर्माण झाली आहे. सरकारी नोकरी मिळणे तर अवघडच आहे. त्यामुळे नोकरी मिळवण्यासाठी वाटेल ते करण्याकडे तरुणाईचा कल आहे. पोलीस शिपाई होण्यासाठी उच्चशिक्षित मैदानात उतरले आहेत. अकोला येथे सुरू असलेल्या शिपाई भरती प्रक्रियेत चक्क आयुर्वेदिक डॉक्टर, अभियंता, पदवीधर रांगेत लागले आहेत.

हेही वाचा >>> Maharashtra police recruitment : कडाक्याची थंडी, त्यात निवाऱ्याचा अभाव, पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांचे हाल

जिल्हा पोलीस आस्थापनेवरील ३९ चालक शिपाई व ३२७ पोलीस शिपाई पदांसाठी राज्यभरातून तब्बल ८ हजारांवर अर्ज आले आहेत. पोलीस मुख्यालय व वसंत देसाई क्रीडांगणावर उमेदवारांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. मैदानी चाचणी बंदोबस्तासाठी दोन उपविभागीय पोलीस अधिकारी, १७ पोलीस निरीक्षक, २२ सहा.पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरिक्षक तसेच २२२ पोलीस अंमलदार नेमण्यात आले आहे. प्रत्येक प्रक्रियेचे चित्रिकरण करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> “हाऊ इज द जोश…!” पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने एका दिवसात उभारले पोलीस मदत केंद्र

पोलीस शिपाई होण्यासाठी बारावी उत्तीर्ण ही पात्रता आहे. मात्र, असंख्य पदवीधरांनी शिपाई होण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. काही पदव्युत्तर शिक्षण घेतलेले उमेदवार देखील आहेत. आयुर्वेदिक डॉक्टर, विविध शाखेचे अभियंते, एम.ए., एम.कॉम., बी.एससी, बी.ए. बी.फॉर्म झालेले असंख्य तरुण-तरुणी पोलीस शिपाई पदासाठी मैदानी चाचणी देतांना दिसून येत आहे.

Story img Loader