लोकसत्ता टीम

गोंदिया: बिलासपूर-नागपूर विभागात यावेळी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगसाठी तिसरी लाईन ब्लॉक करण्यात आली आहे. त्यामुळे रायपूर आणि नागपूरच्या अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. रेल्वे प्रशासनाने मंगळवारी या मार्गावर १८ तासांचा ब्लॉक जाहीर केला.

traffic system in Swargate area will changed on Tuesday November 19 and Wednesday November 20 pune
स्वारगेट भागात दोन दिवस वाहतूक बदल, मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी पीएमपी बस
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Mumbai central railway block loksatta news
मुंबई: मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक
local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
Night special local for the convenience of employees voters Mumbai news
कर्मचारी, मतदारांच्या सोयीसाठी रात्रकालीन विशेष लोकल धावणार
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित

रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हावडा-मुंबई मुख्य मार्गाची दुरुस्ती केली जात आहे. ४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते ५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत म्हणजेच १८ तास काम केले जाणार आहे. गेल्या आठवड्यात राजनांदगाव – कळमना तिसऱ्या मार्गावरील ब्लॉकमुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. यामध्ये कोरबा आणि बिलासपूर आणि झारसुगुडा येथे जाणाऱ्या गाड्यांचा समावेश होता.

हेही वाचा… नागपूर: राज्यातील कोणत्या धरणातून पाण्याचा किती विसर्ग पहा..

रेल्वेचा हा मुख्य मार्ग आता दुसऱ्यांदा ब्लॉक करण्यात आला आहे. तिसऱ्या आणि चौथ्या लाईनच्या कामामुळे गाड्यांचा वेग वाढणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. काही गाड्या वेळेवर धावतील. तर काही गाड्या उशिराने धावणार आहेत.

४ ऑगस्टला या गाड्या रद्द

४ ऑगस्ट रोजी ०८७०७ रायपूर-दुर्ग मेमू, ०८७०८ दुर्ग-रायपूर मेमू, ०८७०९ रायपूर-डोंगरगड मेमू, ०८७२९ रायपूर-डोंगरगड मेमू रद्द राहतील. तर ०८८१५/०८८१६ अंतागड-रायपूर- अंटागड डेमू दुर्ग स्टेशनपर्यंतच धावेल. त्याचप्रमाणे, ०८७१० डोंगरगड-रायपूर मेमू आणि ०८७३० डोंगरगड-रायपूर मेमू पॅसेंजर स्पेशल ५ ऑगस्ट रोजी रद्द राहतील.