नागपूर : पूर्व विदर्भात १ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०२३ दरम्यान हिवतापाचे रोज सुमारे ३१ रुग्ण आढळत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुणे कार्यालयातील नोंदीनुसार, पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या सहा जिल्ह्यांत १ जानेवारी ते ३१ जुलै २०२३ दरम्यान हिवतापाचे २ हजार ८५९ रुग्ण आढळले होते. त्यानंतर १ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०२३ दरम्यान ४३५ रुग्णांची भर पडल्याने ही रुग्णसंख्या थेट ३ हजार २९४ रुग्णांवर गेली. सर्वाधिक ४१९ रुग्ण हे गडचिरोली जिल्ह्यात आढळले. १० रुग्ण गोंदिया, ७ रुग्ण चंद्रपूर जिल्ह्रयात नोंदवण्यात आले.
हेही वाचा – वर्धा : खडतर शस्त्रक्रिया! लसिका ग्रंथींचे हत्तीपायावर यशस्वी प्रत्यारोपण
हेही वाचा – रामटेक वनपरिक्षेत्रात वाघाचा मृत्यू; वीजप्रवाहाने शिकार केल्याची दाट शक्यता
वाढती रुग्णसंख्या बघता आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. परंतु या भागात किटकनाशक फवारणीसह इतरही आवश्यक काळजी घेतली जात असून त्यामुळे आजार नियंत्रणात असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून केला जात आहे.