चंद्रपूर : सावली तालुक्यात एकाचा बळी आणि अनेकांवर हल्ले करणाऱ्या वाघाला वनविभागाच्या पथकाने २१ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर सामदा बिटातील नहराजवळ बुधवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास बेशुद्धीचे इंजेक्शन देवून जेरबंद केले. वाघ जेरबंद होताच परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> खळबळजनक…! वाघिणीचा मृतदेह विहिरित आढळला; घातपाताची शक्यता

सावली तालुक्यातील निलसनी पेडगाव, व्याहाड खुर्द, सामदा या परिसरात वाघाने अनेक नागरिकांवर हल्ले केले होते. यात एकाचा बळीही गेला होता. त्यामुळे शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी लावून धरली होती. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या वाघाला जेरबंद करण्याचे आदेश वनविभागाला दिले होते. दरम्यान, वनविभागाचे पथक मागील २१ दिवसांपासून वाघाच्या मागावर होते. मात्र, वाघ हुलकावणी देत असल्याने जेरबंद करण्यात अडचणी येत होत्या.

हेही वाचा >>> बुलढाणा जिल्ह्यालाही संपाची झळ; ग्रामीणसह शहरी भागात वीजपुरवठा प्रभावित

दरम्यान, बुधवारी सकाळी ६.३० वाजता व्याहाड खुर्द उपवनक्षेत्रातील सामदा बिटातील कक्ष क्रमांक ५०२ मध्ये वनविभागाच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले. यावेळी सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी पी.जी.विरूटकर, वनपाल कोडापे, सूर्यवंशी, शूटर बी.एम.वनकर, वैद्यकीय अधिकारी बशेट्टी व वनरक्षक उपस्थित होते.

मादी बिबट्याच्या मृत्यूने खळबळ

चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील चिंचोली गावालगतच्या शेतशिवारातील झुडपात मादी बिबट मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पायली-भटाळी नियतक्षेत्रातील चिंचोली गाव परिसरात गस्त घालत असताना वनकर्मचाऱ्यांना मादी बिबटचा मृतदेह आढळून आला. मादी बिबट्याचे सर्व अवयव शाबूत आहे. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेहाचे दहन करण्यात आले. पोटाला मार असल्यामुळे अंतर्गत रक्तस्त्रावामुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.