चंद्रपूर : डरकाळी फोडत झाडाझुडपातून अचानक वाघ समोर आला. वाघाचा हा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमावर चांगलाच फिरत आहे. हा व्हिडीओ ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
वाघाच्या दर्शनसाठी विदर्भातील ताडोबा, मेळघाट, बोर, नवेगाव – नागझिरा तथा पेंच प्रकल्पात देश विदेशातून पर्यटक येतात. ताडोबात तर हमखास वाघाचे दर्शन होते. मात्र कधी कधी पर्यटकांना वाघ दर्शन देत नाही. मोबाईल आल्यापासून आता तर जंगलातील वाघाचे अनेक व्हिडीओ समाज माध्यमावर सार्वत्रिक झाले आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच सार्वत्रिक झाला आहे.
हेही वाचा – गोंदिया : टी-१ वाघिणीची मध्यप्रदेशच्या दिशेनं वाटचाल; आमगाव – सालेकसा तालुक्यात दहशत
जंगलात रस्त्याच्या कडेला एक मोटर सायकल आहे. मोबाईल कॅमेरा जंगलातील हिरवळीचे चित्रीकरण करीत समोर जात असताना अचानक समोरच्या झाडीतून वाघ डरकाळी फोडत समोर येतो आणि पुन्हा झाडीमध्ये जातो. वाघाच्या डरकाळीवरून वाघ आक्रमक पवित्रा घेत बाहेर येताना दिसत आहे. मात्र तो पुन्हा जंगलात जातो. या वाघाची सर्वत्र चर्चा आहे.