भंडारा : एकाच आठवड्यात पवनी तालुक्यातील दोघांवर हल्ला करून ठार करणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आले आहे.आरआरटी भंडारा, नवेगाव नागझिरा व्याघ्रप्रकल्प यांचे पथक, आरआरटी गोंदिया यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. पवनी तालुक्यातील गुडगाव आणि खातखेडा येथील दोघांचा बळी घेतल्यानंतर या वाघाला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. अखेर ड्रोनच्या सहाय्याने या वाघाचा शोध घेऊन त्याला बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर त्याला जेरबंद करण्यात आले.

उपवन संरक्षक राहुल गवई, उपविभागीय वन अधिकारी विगीलन्स कोडपे, सहाय्यक वन संरक्षक साकेत शेंडे, रोशन राठोड, क्षेत्रीय वन अधिकारी रूपेश गावित, ठोंबरे, लहू ठोकरे, मानद वन्यजीव सदस्य नदीम खान आणि शाहीद खान हे यावेळी उपस्थित होते.