तिघे जखमी, हैद्राबादनजीक अपघात
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
यवतमाळ: यवतमाळ येथील मानसिक रोगतज्ज्ञ डॉ. पीयूष बरलोटा यांच्या वाहनाला तेलंगणामध्ये हैदराबाद ते निर्मल मार्गावर अपघात झाला. या अपघातात डॉ. पीयूष बरलोटा यांच्या पत्नी प्रसूती रोगतज्ज्ञ डॉ. सुरेखा बरलोटा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज, मंगळवारी दुपारी घडली.
डॉ. बरलोटा व त्यांचे मित्र कुटुंबासह फिरायला गेले होते. हैदराबाद येथून चारचाकी वाहनाने यवतमाळकडे परत येत असताना हैदराबाद ते निर्मल मार्गावर निर्मलपासून १२ किमी अंतरावरील टोल नाक्यानजीक त्यांच्या चारचाकी वाहनाचा टायर फुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली. यात डॉ. सुरेखा बरलोटा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पूजा पीयूष बरलोटा (१६), अतिथी (१८) आणि मिनल (४०) हे तीण जण जखमी झाले. नागरिकांनी जखमींना वाहनाबाहेर काढून निर्मल येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
हेही वाचा >>> यवतमाळ : वाढदिवसाच्या कार्यक्रमात देशीकट्ट्यातून हवेत गोळीबार
ही वार्ता कळताच यवतमाळ येथील डॉक्टर्स निर्मलकडे रवाना झाले. हैदराबाद येथील डॉक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारीदेखील घटनास्थळी पोहोचले. निर्मल येथील शासकीय रुग्णालयात मृत डॉ. सुरेखा बरलोटा यांचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेने यवतमाळच्या वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.