नागपूर : नागपूरहून गोव्यातील मडगावला जाणारी रेल्वेगाडी आता ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे, तर तिकडून नागपूरला येणारी रेल्वे १ ऑक्टोबरपर्यंत धावणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या रेल्वेगाडीला प्रवाशांचा प्रतिसाद बघता तिला आणखी तीन महिने मुदतवाढ देण्यात येत आहे. गाडी क्रमांक ०११३९ नागपूर-मडगाव द्वि-साप्ताहिक विशेष १ जुलै २०२३ पर्यंत होती. आता ती ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत धावणार आहे. गाडी क्रमांक ०११४० मडगाव-नागपूर द्वि-साप्ताहिक विशेष २ जुलै २०२३ पर्यंत होती. आता ती गाडी १ ऑक्टोबर २०२३ पर्यंत धावणार आहे. तसेच गाडी क्रमांक ०११२७ लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) – बल्लारशाह साप्ताहिक स्पेशल गाडी आता २६ सप्टेंबर २०२३ धावणार आहे. ही गाडी २७ जून २०२३ पर्यंत होती.

हेही वाचा – “महाविकास आघाडी म्हणजे कावळा, घुबड व सरड्याची अभद्र युती,” भाजपाचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका, म्हणाले…

गाडी क्रमांक ०११२८ बल्लारशाह – लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) साप्ताहिक स्पेशल गाडी आता २७ सप्टेंबर २०२३ पर्यंत धावणार आहे. ही गाडी आधी २८ जून २०२३ पर्यंत होती.