नागपूर : मुंबई – हावडा (व्हाया नागपूर) या व्यस्त मार्गाचा अविभाज्य भाग असलेल्या मनमाड-भुसावळ विभागातील वाहतूक गर्दी कमी करण्यासाठी आवश्यक नवीन तिसऱ्या रेल्वे मार्गाची चाचणी यशस्वी झाली आहे. यामुळे केवळ ऑपरेशनल कार्यक्षमतेतच वाढ करणार नाही तर संपूर्ण रेल्वे नेटवर्कवर ट्रेनचा वेगदेखील वाढणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – अल्पवयीन मतिमंद मुलीवर अत्याचार, नराधमास २० वर्षांची शिक्षा

हेही वाचा – गोंदिया: नवेगावबांध जवाहर नवोदय विद्यालयात हे चाललंय तरी काय? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मध्य रेल्वेने भुसावळ – मनमाड तिसर्‍या मार्गाच्या विद्युतीकरण प्रकल्पाच्या विद्युतीकरणासह मनमाड-नांदगाव सेक्शनची २५ किमीची नवीन तिसरी लाईन यशस्वीरित्या सुरू केली. जो महत्त्वाकांक्षी १८३.९४ किमी भुसावळ-मनमाड तीसरी लाईन विद्युतीकरण प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या मार्गावर काल गुरुवारी १३० किलोमीटर प्रती तास गतीची चाचणी घेण्यात आली. त्यानंतर मध्य रेल्वेने भुसावळ – मनमाड तिसर्‍या मार्गावरील मनमाड-नांदगाव सेक्शनमधील २५ किमीचा नवीन तिसरा रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी खुला केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The trial run of the new third rail line required to ease traffic congestion in the manmad bhusawal section has been successful rbt 74 ssb