दिवाळीनिमित्त पतीसह माहेरी जाणाऱ्या महिलेने ट्रकला हात दाखवून त्यातून प्रवास सुरू केला. मात्र, ट्रकचालक आणि साथिदाराने पतीला चाकूचा धाक दाखवून पत्नीवर बलात्काराचा प्रयत्न केला. दरम्यान, एक वाहनचालक मदतीला धावल्यामुळे अनर्थ टळला. या प्रकरणी वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.
हेही वाचा >>>अमरावतीत दोन मजली इमारत कोसळल्याची दुर्दैवी घटना; चौघांचा मृत्यू
वाडीत राहणारी १९ वर्षीय नवविवाहित तरुणी आपल्या पतीसह शुक्रवारी सायंकाळी माहेरी जात होती. वाडी नाक्याजवळ त्यांनी एका ट्रकला (एमपी १७ एचएच २६८४) हात दाखवला. ट्रकचालक ईरशाद फईद खान (३९, उज्जैन, मध्यप्रदेश) आणि साथिदार विष्णू चव्हाण यांनी दोघांनीही ट्रकमध्ये बसवून घेतले. काही अंतरावर ट्रक थांबवला व इरशादने चाकू काढून तो विवाहितेच्या पतीच्या पोटाला लावला व त्याला ट्रकच्या खाली उतरवले. त्याने तो ट्रक जवळपास एक किलोमिटर पुढे नेऊन विवाहितेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा >>>वंचितच्या सत्तेसाठी भाजपात फूट ; अकोला जि.प. सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपची ‘मविआ’ला तीन, तर वंचितला दोन मते
महिलेने आरडाओरड केल्यामुळे एका वाहनचालकाला संशय आला. त्याने अन्य वाहनचालकांना थांबवले आणि महिलेची मदत केली. या दरम्यान महिलेचा पतीही ट्रकजवळ पोहचला. या प्रकरणी महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली.