बुलढाणा: खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा परिसरात घडलेल्या विचित्र अपघातात एक चालक ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. राहुड फाट्याजवळ आज शुक्रवारी (दि २७) ही दुर्घटना घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एसटी महामंडळाच्या खामगाव आगाराची बस (एमएच ६ एस ८२५६) प्रवासादरम्यान बिघडली. आगाराची दुसरी बस (एमएच ४० क्यू ६१३०) टोचन करून या बसला खामगाव कडे येत होती. दरम्यान समोरून येणाऱ्या (एम एच ०४ /८८५५ क्रमांकाच्या) मालवाहू वाहनाने बसला भरवेगात धडक दिली. यामुळे ट्रकचालक नईम शहा कयूम शहा (रा. राजूर, ता मोताळा जिल्हा बुलढाणा) हा जागीच दगावला. बसचालक अरविंद दामोदर (जळका भडंग ता खामगाव) हा गंभीर जखमी झाला.

हेही वाचा… डी.जे.च्या आवाजाने मधमाशा उडाल्या; दोन किलोमिटरपर्यंत केला लोकांचा पाठलाग

तसेच बसचे ४५ हजार रूपयांचे नुकसान झाले. दामोदर याने दिलेल्या तक्रारीवरून पिंपळगाव राजा पोलिसांनी (मृतक) नईम विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The truck driver died and bus driver injured in an accident between st bus and cargo vehicle in pimpalgaon raja buldhana scm 61 dvr