नागपूर : दि मेडिकल काॅलेज ॲण्ड हाॅस्पिटल एम्प्लाॅईज क्रेडिट सोसायटी लि.च्या नवीन संचालक मंडळासाठी ३ जुलैला आयोजित निवडणूक केंद्राच्या स्थळावरून वाद निर्माण झाला होता. यावेळी तीन पॅनलने ही निवडणूक मेडिकल परिसरात घेण्याची विनंती केल्यावरही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. लोकसत्ताने वृत्त दिल्यावर सहाय्यक निबंधकांनी ही निवडणूक मेडिकलमध्ये घेण्याचे ठरवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणूक निर्णय अधिकारी जयंत पालटकर यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनावरून हा प्रकार पुढे आला. दि मेडिकल काॅलेज ॲण्ड हाॅस्पिटल एम्प्लाॅईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. नागपूर या संस्थेत २ हजार ९८ सभासद आहे. संस्थेची निवडणूक ३ जूलै २०२३ रोजी सकाळी ८ ते ४ वाजता दरम्यान वकीलपेठ येथील आनंद पब्लिक स्कूलमध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. दरम्यान, या निवडणुकीत चारपैकी तीन पॅनलने ही निवडणूक मेडिकल परिसरात घ्यावी, जेणेकरून कर्मचाऱ्यांना मतदानाला अडचण येणार नसल्याची मागणी केली. त्यामुळे ही निवडणूक आता मेडिकलमधील अधिष्ठाता बंगला क्रमांक ८ मध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The venue of medical employees society elections has finally changed mnb 82 ysh
Show comments