माळी समाजाला सत्तेत भागीदारी न मिळाल्यास प्रस्तापितांना धडा शिकवू, असा इशारा विदर्भ माळी समाज संघटनेने दिला आहे. शनिवारी २५ फेब्रुवारी ला नागपूर येथे संघटनेचे अध्यक्ष प्रा. अरुण पवार यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भातील माळी समाजातील ज्येष्ठ नेते व समाजबांधवांची बैठक झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- बुलढाणा : सावकाराने इतके छळले की, शेतकऱ्याने आत्महत्या केली; कुटुंबाने रुग्णालयात ठिय्या दिल्यावर गुन्हा दाखल

माळी समाज सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक, आर्थिक व राजकीयदृष्ट्या मागासलेला आहे. ग्रामीण भागात समाजाची स्थिती दयनीय आहे. राजकीय क्षेत्रात लोकसंख्येच्या प्रमाणात भागीदारी न मिळाल्यामुळे समाजाची प्रगती खुंटली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत विविध राजकीय पक्षांनी लोकसंख्येचा तुलनेत माळी समाजाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली व याकडे प्रस्थापित राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केल्यास आगामी निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा बैठकीत देण्यात आला. या बैठकीला माजी आमदार अनुक्रमे बळीराम सिरस्कार, (बाळापूर), अशोकराव मानकर (नागपूर), यांच्यासह नानाभाऊ लोखंडे, छगन मेहत्रे ( सिंदखेड राजा), मंगेश चिखले, विलास सपाटे (वरोरा) डॉ. ज्ञानेश्वर गोरे (यवतमाळ),डॉ. पुष्पाताई तायडे ( वर्धा), वासुदेवराव चौधरी (अमरावती), नंदू नागरिकर ( चंद्रपूर), यांच्यासह मोठया प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The vidarbha mali samaj sangathan has warned that if the mali samaj does not get a share in power it will teach a lesson to the promoters cwb 76 dpj