वर्धा : आर्थिक देवाणघेवाण करीत प्रकरण परस्पर निकाली काढण्याचे प्रकार नवे नाही. पोलीस खात्यावर असे आरोप नेहमी होत असल्याचे चित्र आहे. ते बदलण्याचा चंग बांधणाऱ्या पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी दोन पोलिसांना निलंबित करीत कायद्याचा वचक निर्माण करण्याचा धडा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – उसापासून इथेनॉलनिर्मितीस अखेर मंजुरी; केंद्राचा निर्णय, १७ लाख टन साखरेची मर्यादा  

हेही वाचा – महिला अत्याचारविरोधातील ‘शक्ती कायदा’ बारगळणार; अनेक तरतुदींना केंद्राचा आक्षेप

हिंगणघाट येथे काही युवकांना अमली पदार्थाचे सेवन करताना ताब्यात घेण्यात आले होते. पण त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. हे प्रकरण काही पोलीस कर्मचाऱ्यांनी परस्पर आर्थिक व्यवहार करीत सोडून दिल्याची चर्चा रंगली होती. पोलीस निरीक्षक मारुती मूलक यांनी या प्रकरणात चौकशी सुरू केली. त्यात तथ्य आढळून आले. पोलीस अधीक्षक हसन यांनी प्रकरण परस्पर निपटल्याचा ठपका ठेवत शहर मार्शल पथक प्रमुख विवेक बनसोड व पोलीस नाईक पंकज घोडे यांना तत्काळ निलंबित केले. तसेच हवालदार प्रशांत वाटखेडे आणि सौरव गेडाम या दोघांना पोलीस मुख्यालयात बदलीवर पाठविण्यात आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The wardha sp suspended two police what is the matter pmd 64 ssb