नागपूर : राज्यात ऐन उन्हाळ्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यातच पुन्हा आता हवामानखात्याकडून राज्याला अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. येत्या ४८ तासांत गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामानखात्याने व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भातील बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अकोला, नागपूर, गोंदिया, वर्धा जिल्ह्यात पावसाची शक्यता असून, पुढचे २४ तास मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण कोकण, गोवा, पश्चिम किनारपट्टी, उत्तर कर्नाटक आणि उत्तरप्रदेशातील काही भागांवर मेघगर्जनेसह पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम विदर्भात गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली असून, अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर राज्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार या शहरांमध्येही पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा – वर्धा : अशी ही बनवाबनवी; सरपंच कुणाचे, दावा कुणाचा

हेही वाचा – दंगल, ‘वज्रमूठ’नंतर संभाजीनगरमध्ये ‘ओबीसीं’चा आवाज होणार बुलंद! ‘मंडल आयोग’ अध्यक्षांच्या नातवाचे मार्गदर्शन प्रमुख आकर्षण

प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यात शनिवार, आठ एप्रिलपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. सात आणि आठ एप्रिलला विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरुपात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी पश्चिम विदर्भात, तर शनिवारी पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे.