लोकसत्ता टीम

गोंदिया: गोरेगाव तालुक्यातील गिधाडी येथे अवैधरित्या देशी, विदेशी दारूविक्री बंदीचा निर्णय महिलांनी ग्रामसभेत घेतला असून, यापुढे कोणी दारू विक्री करताना आढळल्यास त्याच्यावर एक लाख रुपये दंड आकारला जाणार आहे. या निर्णयामुळे गावातून अवैध दारूविक्री हद्दपार होईल, यात शंका नाही.

prohibited tobacco products seized, Mhatrenagar in Dombivli, Dombivli, tobacco,
डोंबिवलीत म्हात्रेनगरमध्ये प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थांचा साठा जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
CCTV camera installed in 60 prisons due to inmate attacks and illegal provisions
सुरक्षेचा ‘तिसरा डोळा’बंदच; अंमली पदार्थ, मोबाईलच्या वापरावर नियंत्रण येणार तरी कसे?
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
Panje Dongri wetlands, Uran, dry
उरण : आंतरभरती प्रवाह बंद झाल्याने पाणजे पाणथळ कोरडी
Malvan Shivputla accident case Hearing on bail plea of ​​Jaideep Apte Chetan Patil in High Court Mumbai news
मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण: जयदीप आपटे, चेतन पाटीलच्या जामीन याचिकेवर उच्च न्यायालयातच सुनावणी
Pune Burglary attempted, Sadashiv Peth Burglary,
पुणे : सदाशिव पेठेत भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न, महिलेला धक्का देऊन चोरटा पसार

गिधाडी येथे जवळपास १५ ते १८ जणांकडून अवैधरित्या दारूविक्री केली जाते. त्यामुळे गावातील किशोरवयीन, तरुण व्यसनाधीन बनले आहेत. गावात अवैध देशी, विदेशी दारू विक्रीवर आळा घालण्याचा गावकऱ्यांनी प्रयत्न केला; पण अवैध दारूविक्री बंद करता आली नाही. दारूचा वाढता खप पाहता परवानाधारक देशी दारू (किरकोळ विक्रेत्याने कायमस्वरूपी दुकान थाटण्यासाठी ग्रामपंचायतीकडे नाहरकत प्रमाणपत्रा करिता रितसर अर्ज दाखल केला.

आणखी वाचा-राज्यातील ओबीसी विद्यार्थी आमदारांच्या पायरीवर ठिय्या देणार; सुरवात उपमुख्यमंत्र्यांच्या सचिवापासून…

त्यामुळे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांनी महिला ग्रामसभा, विशेष ग्रामसभा आयोजित केली होती. या ग्रामसभेत देशी दारू दुकान परवाना धारकास नाहरकत प्रमाणपत्र देण्यात यावे किंवा नाहरकत प्रमाणपत्रास नकार देण्यात यावा, यासाठी १८ जून रोजी महिला ग्रामसभा व १९ जून रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ही ग्रामसभा भरण्यापूर्वी महिलांनी गावात महिला जागृती मोर्चा काढला. गावातील अवैध दारूविक्री करणाऱ्यांना ताकीद दिली व ग्रामपंचायत भवनात आयोजित ग्रामसभेत परवानाधारक देशी किरकोळ दुकान लावण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देऊ नये, गावात अवैध देशी, विदेशी दारूची विक्री करताना आढळल्यास एक लाख रुपये दंड ठोठावला जावा, असा निर्णय महिलांनी ग्रामसभेत घेतला.

अवैध दारू विक्री करणाऱ्याची माहिती देणाऱ्यास ५० हजार रुपये बक्षीस व उर्वरित ५० हजार रुपये गावाच्या विकासासाठी खर्च करण्यात यावे, असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. ग्रामसभा दरम्यान गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

गिधाडी येथे अवैध धंदे करणाऱ्यांवर नियमाप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परवाना धारक देशी दारू दुकान लावण्यासाठी परवानगी देणे किंवा न देणे हे काम ग्रामपंचायतच्या अखत्यारीत आहे. -अजय भुसारी, पोलिस निरीक्षक, गोरेगाव.