नागपूर : एका महिलेची पर्स चोरी करून आरोपी एसटीने फरार होण्याच्या तयारीत असतानाच कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी एसटी बसला थेट सदर पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी पाचही महिलांना अटक करून त्यांच्या विरूद्ध गुन्हा नोंदविला आहे. रश्मिका नाळे (२८), अनू मानकर (२४), शीला मानकर (४०), पायल मानकर (४०) आणि सुहासिनी लोंढे (३०) सर्व रा. बुटीबोरी, ही अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गुरप्रीतकौर जसपालसिंग रयत (वय ४५, रा. आस्था सोसायटी, टेकानाका, पाचपावली या आपल्या आईवडिलांना सोडण्यासाठी सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लिबर्टी चौकात सिटी बसस्थानकावर आल्या होत्या. आई वडिलांना बसमध्ये बसवित असताना त्यांच्या आजुबाजुला असलेल्या पाच महिलांनी गुरप्रीतकौर यांच्या हँडबॅगची चेन उघडून त्यातील छोटी पर्स, कागदपत्र, लायसन्स व रोख १ हजार रुपये असा मुद्देमाल चोरी केला. चोरी झाल्याचे लक्षात येताच गुरप्रीतकौर यांनी आरडाओरड केली. यावेळी चौकात कर्तव्यावर हजर असलेल्या वाहतूक पोलिसांनी शोधाशोध केली असता चोरी केलेल्या महिला एका बसमध्ये चढताना दिसल्या. लगेच वाहतूक पोलीस त्यांच्या मागोमाग बसमध्ये चढले. त्यांनी बसचे दार बंद करून बस थेट सदर पोलीस ठाण्यात आणली. तेथे आरोपी महिलांना सदर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

bhandup police arrested accused who forced women into prostitution by luring money
महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणारा आरोपी अटकेत
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Rickshaw driver arrested , molesting woman ,
पुणे : प्रवासी महिलेचा विनयभंग करणारा रिक्षाचालक अटकेत
man stolen woman s jewellery worth rs 6 lakhs by pretending police
पोलीस असल्याच्या बतावणीने महिलेचे सहा लाखांचे दागिने चोरले
Torres Scam Case, High Court, police, Torres Scam,
टोरेस घोटाळा प्रकरण : कार्यतत्परतेत पोलिसांकडून कसूर, पोलिसांच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाचे पुन्हा ताशेरे
MLA hemant Rasane treatment Guillain Barre syndrome patients
गुइलेन बॅरे सिंड्रोम रुग्णांवर उपचारांसाठी आमदार रासने यांची मोठी मागणी, म्हणाले…!
pimpri chinchwad police commissioner vinay kumar choubey on illegal money lending
पिंपरी : अवैध सावकारी करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई; पोलीस आयुक्तांचा आदेश
Fraud of 13 lakhs , fear of action, Pune, Fraud,
पुणे : कारवाईची भीती दाखवून महिलेची १३ लाखांची फसवणूक

हेही वाचा – यवतमाळ : प्रकल्प अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी, शासनाची २० लाखांनी फसवणूक

हेही वाचा – नागपूर : आरटीओ संकेत गायकवाड आणि गीता शेजवळवर गुन्हे दाखल, गीता शेजवळनेच झाडली संकेतवर गोळी

पाचही महिला आरोपींविरुद्ध कलम ३७९, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सदर वाहतूक विभागाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र झरबडे, विनायक इंगळे, इंदल भजन, मंदा धुर्वे, प्रविण पांडे यांनी केली.

Story img Loader