बुलढाणा: मणिपूर येथील अमानवीय घटनेच्या निषेधार्थ आझाद हिंद संघटनेच्या महिला आघाडीतर्फे येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आज दुपारी संस्थापक अध्यक्ष ॲड. सतीश रोठे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी संगम चौकात रस्त्यावरच ठिय्या मांडला.
हाती मणिपूर घटनेचा निषेध करणारे व अन्य मागण्या दर्शविणारे फलक असलेल्या आक्रमक महिलांनी पादचारी व वाहन धारकांचे लक्ष वेधले. यामुळे काही काळ परिसरातील वाहतूक ठप्प पडली. यावेळी जिल्ह्यातील अवैध व्यवसाय बंद करावे, शहरातील नागरिकांना सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या, या अन्य मागण्याकडेही लक्ष वेधण्यात आले.