नागपूर: शहरा लगतच्या तीर्थक्षेत्र कोराडी येथील जगदंबा माता मंदिरात सध्या नवरात्र उत्सव सुरू असून तेथे रोज लाखो भाविक दर्शनासाठी जातात. भाविकांच्या सोयीसाठी विविध ठिकाणी लाकडी प्रवेशव्दार तयार करण्यात आले आहेत. यापैकी एक व्हीआयपींसाठी तयार केलैले प्रवेशव्दार शुक्रवारी वादळी वा-यामुळे कोसळले. यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या आक्टोबरच्या उन्हाचा  फटका सर्वांना बसतो आहे. मात्र शुक्रवारी कोराडीत वातावरणात अचानक बदल होत जोरात वारे वाहू लागले. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेले लाकडी प्रवेशव्दार कोसळले. या घटनेनंतर मंदिर व्यवस्थापनाने तातडीने पावले उचलली. शुक्रवार असल्याने मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली आहे. भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने नागपूरहून विशेष बससेवा सुरू केली आहे.