नागपूर : जयंत तांदुळकर यांनी तयार केलेल्या सर्वात लहान चरख्याची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड – २०२३’ मध्ये नोंद करण्यात आली आहे. झिंगाबाई टाकळीमधील रहिवासी असलेले जयंत तांदुळकर महालेखाकार कार्यालयात वरिष्ठ लेखापाल या पदावर कार्यरत आहे.

तांदुळकर यांना नवनवीन कलाकृती बनवण्याचा छंद आहे. त्यांनी सूत कताईच्या चरख्यांच्या विविध लहान आकाराच्या प्रतिकृती तयार केल्या आहेत. यापैकी एका चरख्याची लांबी ३.२० मिमी, रुंदी २.६८ मिमी आणि उंची ३.०६ मिमी आहे व वजन ४० मिलिग्रम आहे. त्यासाठी लहान लाकडी काड्या, स्टीलचे तार, आणि कापूस धागा इत्यादीचा वापर केला.

हेही वाचा – ताडोबात बिबट व अस्वल समोरासमोर उभे ठाकले; पर्यटकाने काढलेल्या छायाचित्राची ‘सोशल मीडिया’वर चर्चा

चारख्याचे वैशिष्ट्य म्हणजे आकाराने लहान असला तरी चरख्याव्दारे सूत काढता येते. हा जगातील सर्वात लहान आकाराचा चरखा असल्याचा दाावा तांदुळकर यांचा आहे. त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स २०२१ आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स २०२२ आणि आता लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड २०२३ मध्ये करण्यात आली आहे. त्याचे प्रमाणपत्रही त्यांना प्राप्त झाले आहे.

हेही वाचा – बुलढाणा : भीम जयंती फलकाची विटंबना! खामगाव परिसरात तणाव, शेकडो नागरिक रस्त्यावर

यापूर्वी त्यांनी लहान आकाराची भगवद्गीतादेखील तयार केली आहे. त्याचा आकार आकार १ बाय अर्धा इंच आहे. तसेच ६ बाय ११ मिमी आकाराची एक छोटी खाटदेखील तयार केली आहे. या खाटेची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड २०२० मध्ये झाली आहे.

Story img Loader