यवतमाळ: पूर्ववैमनस्यातून गळा आवळून तरुणाचा खून करण्यात आला. त्यानंतर दोन्ही हातपाय बांधून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह नदीपात्रात फेकून दिला. ही घटना पुसद येथील तवक्कल शहाबाबा दरग्याजवळ उघडकीस आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुसद शहर पोलिसांनी या घटनेचा चार तासांत छडा लावत विधीसंघर्षग्रस्त बालकासह दोघांना अटक केली. शेख आजीम उर्फ बाबू शेख युनूस (२३, रा. आंबेडकर वार्ड, पुसद) असे मृताचे नाव आहे. अनिकेत रवी मस्के (१८, रा. मुखरे चौक), अजय पंडित जोगदंडे (२१, रा. आंबेडकर वार्ड), अशी अटकेतील संशयित आरोपींची नावे असून, आरोपीमध्ये एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे.

हेही वाचा… ३ लाख नोकऱ्या तयार, २०२८ पर्यंत ‘डेटा’ क्षेत्रातील उलाढाल वाढणार

शेख आजीम हा लगेच परत येतो असे आईला सांगून घरून बाहेर पडला. मात्र तो तो परत आला नाही, त्यामुळे १५ ऑक्टोबरला शेख सलीम शेख युनूस ( रा. मच्छी मार्केट, पुसद) याने पुसद शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान सोमवारी तवक्कल शहाबाबा दरग्याजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळला. त्यामुळे शेख सलीम याने जावून बघितले असता, मृतदेह भावाचा असल्याची ओळख पटविली. तरुणाचा गळा आवळून खून करण्यात आल्यावर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह नदीपात्रात फेकून दिला. पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला.

हेही वाचा… उपराजधानीत पुन्हा खूनसत्र! चोवीस तासांत दोन हत्याकांड

शेख आजीमसोबत रात्री असलेल्या काही मुलांबाबत डिबी पथकाने गोपनिय माहिती मिळविली. संशयितांना पोलिसांनी खाक्या दाखवित विचारपूस केली असता, पूर्ववैमनस्यातून खून केल्याची कबुली आरोपींनी दिली. दोघांना अटक करण्यात आली असून, विधीसंघर्षग्रस्त बालकाला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर, सहायक पोलीस निरीक्षक प्रेमकुमार केदार, डीबी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे आदींनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The young man was killed by strangulation due to previous enmity in pusad yavatmal nrp 78 dvr