सिग्नल तोडून पळून जाणाऱ्या दुचाकी चालकाला अडवण्याचा प्रयत्न करताना आरोपीने दुचाकी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी चढवली. या घटनेत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मिथून चवरे असे जखमी पोलीस शिपायाचे नाव आहे.
हेही वाचा- नागपूर : हॉटेलमध्ये चालले होते ‘ते’ प्रकार, पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून…
मिळालेल्या माहितीनुसार, मिथून हे कामठी रोडवरील ऑटोमोटिव्ह चौकात कर्तव्यावर होते. सकाळी ११ ते ११.३० वाजताच्या दरम्यान एका दुचाकीवर दोघे जण आले. त्यावेळी ऑटोमोटिव्ह चौकातील सिग्नल बंद होता. आरोपी चालकाने सिग्नल तोडून दुचाकी वेगात काढली. सिग्नल तोडल्याचे लक्षात येताच मिथून यांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी चालकाने गाडी अडवणाऱ्या शिपायाच्या अंगावर गाडी नेली. या घटनेत मिथून हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून पायाचे हाड मोडले.
हेही वाचा- चंद्रपूर: शिवारात गेलेल्या इसमावर वाघाचा हल्ला, ८०० मीटरपर्यंत फरपटत नेले आणि…
आरोपी चालक मिथून यांना धडक देऊन वेगात फरार झाले. घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी आरोपी चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी चौकात असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ते बंद असल्याचे पुढे आले. त्यामुळे आरोपीचा शोध घेणे आता पोलिसांसमोर आव्हान ठरले आहे. जखमी मिथून यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.