नागपूर: दोन महिन्यांपूर्वी लग्न झाल्यानंतर युवकाने पत्नीसह संसार सुरु केला. मात्र, युवकाच्या प्रेयसीने लग्नाची गळ घातली. संभ्रमात सापडलेल्या युवकाने प्रेयसीच्या मदतीने पत्नीचा खून केला. या हत्याकांडाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने करीत पती आणि प्रेयसीला अटक केली. दिव्या ताराम-यादव असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पती छोटूलाल समोलाल यादव (२१, बोरी, सिंगूरी) आणि त्याची प्रेयसी स्विटी हिला अटक करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छोटूलाल यादव हा शेतमजूर असून त्याची गेल्या एका वर्षांपूर्वी दिव्या ताराम हिच्याशी ओळखी झाली होती. एकाच शेतात काम करीत असताना दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतले. दोघांचा संपर्क वाढला आणि प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दिव्याने आपल्या आईवडिलांना सांगून छोटूलालशी लग्न करून देण्याची मागणी केली. ऑगस्ट महिन्यांत दिव्या आणि छोटूलाल यांचे लग्न झाले. दोघांचा सुरळीत संसार सुरु होता. दरम्यान, छोटूलालची दुसरी प्रेयसी स्विटी हिने घरी येऊन गोंधळ घातला. त्यामुळे दिव्याला स्विटीबाबत माहिती मिळाली. पती-पत्नीच्या संसारात स्विटीने मिठाचा खडा टाकला आणि निघून गेली.

हेही वाचा… नागपूर: चिडलेल्या सासूचा जावयावर चाकूने हल्ला

घरात दोघांचे वाद वाढले. तर स्विटीनेही छोटूलालला लग्न करण्याची तयारी दर्शविली. गेल्या १८ ऑक्टोबरला छोटूलालने फिरायला नेण्याच्या बहाण्याने दिव्याला जंगलात नेले. दरम्यान, स्विटीही तेथे पोहचली. दोघांनी मिळून दिव्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. तिचा मृतदेह जंगलात फेकून दोघेही घरी आले. कुजलेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह आढळल्याने स्थानीग गुन्हे शाखेचे प्रमुख ओमप्रकाश कोकाटे, राजीव कर्मलवार यांनी घटनास्थळाला भेट दिली. तेथे एक ओढनी आणि पितळेची बांगडी आढळळी. त्या धाग्यावरून गुन्हे शाखेने दिव्याचा शोध घेतला. पती आणि प्रेयसीला अटक केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The youth killed his wife with the help of his girlfriend in nagpur adk 83 dvr