विदर्भ म्हटले की आठवते येथील अस्सल सावजी जेवण. या सावजीचे भल्या भल्याना वेड. अनेक जण तर केवळ सावजी खायला नागपूर गाठतात. मग, अधिवेशनाला आलेले आमदार तरी किती काळ सावजीपासून अलिप्त राहू शकणार? अखेर त्यांनी मोका साधलाच. मंगळवारी सभागृह तहकूब झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या युवा आमदारांनी विधानभवन परिसरातील हॉटेलमध्ये विदर्भाच्या प्रसिद्ध सावजी जेवणावर मनसोक्त ताव मारला.

सभागृहाचे कामकाज तहकूब का केले?

नगर विकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी केलेल्या नागपूर सुधार प्रन्यासच्या भूखंड वाटपाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाने या निर्णयावर ताशेरे ओढले आहे. या मुद्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने मंगळवारी विधानपरिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या मागणीला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला. या मुद्यावर सभागृहात प्रचंड गदारोळ झाल्याने सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले.

Demand money from company owner in name of MLA Pune news
आमदाराच्या नावाने कंपनी मालकाकडे पैशांची मागणी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Ashok Uike, Vasant Purke
राळेगावमध्ये भाजपचा अतिआत्मविश्वास काँग्रेसच्या पथ्यावर ! दोन माजी मंत्र्यांमध्ये थेट लढत
dcm devendra fadnavis criticized congress mla ravindra dhangekar
‘कसब्या’तील आमदारांची कामे कमी आणि दंगा जास्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
कसब्यात एक ॲक्सिडेंटल आमदार तयार झाला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार रविंद्र धंगेकर यांना टोला
former ministers who rebel and won
अनेक माजी मंत्री, आमदारांचा बंडखोरी करून विजयाचा इतिहास, देशमुख, केदार, बंग, जयस्वाल आदींचा समावेश
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
Sharad Pawar, Sudhir Kothari Hinganghat,
वर्धा : अखेर शरद पवार थेट ‘हिंगणघाटच्या शरद पवारां’च्या घरी, म्हणाले…

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचे कामकाज सुरू झाल्यावर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी एन आय टी भूखंड वाटपाचा मुद्दा उपस्थित केला. एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असतानाच्या काळातील हा निर्णय असून न्यायालयाने याला स्थगिती देतांना मंत्र्यांवर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी दानवे यांनी केली. मात्र प्रश्नोत्तराच्या तासानंतर या मुद्यावर चर्चा केली जाईल, असे सांगून सरकारकडून हा मुद्दा टोलवण्याचा प्रयत्न झाला, मात्र विरोधी पक्ष आ्ग्रही असलेल्याने सभागृहात गदारोळ झाला. त्यामुळे उपसभापतींनी कामकाज १० मिनिटे तहकूब केले.