नागपूर: शहरातील चोरांची हिंमत इतकी वाढली आहे की, त्यांनी चक्क पोलिस क्वॉर्टरमध्येच घरफोडी केली. घराला कुलूप लावून कुटुंबासह बाहेर गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या घराचे कुलूप तोडून ३ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. ही घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत रघुजीनगर पोलिस क्वॉर्टरमध्ये घडली.

पोलिसांनी व्यंकट हरीभाऊ गंधाळे (३९) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. व्यंकट मुख्यालयात कार्यरत असून राजभवन येथे त्यांची तैनाती आहे. गत शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास व्यंकट घराला कुलूप लावून कुटुंबासह बुट्टीबोरी येथे गेले होते. या दरम्यान अज्ञात आरोपींनी मुख्य दाराचे कुलूप तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला.

Gang involved in gold chain and vehicle theft arrested
सोनसाखळी, वाहनचोरी करणारी टोळी उघडकीस; सराईत अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Pune, kidnappers , Crime Branch action,
पुणे : अपहरण करणारे गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई, आर्थिक व्यवहारातून अपहरण
kalyan Dombivli police
कल्याण – डोंबिवलीत चोरीचा एक कोटी ४३ लाखांचा मुद्देमाल नागरिकांना परत
three suspect arrested in attempted kidnapping school boy
उमराळ्यात शाळकरी मुलास पळविण्याचा प्रयत्न; तीन संशयितांना अटक
Nagpur, suicide , police station,
नागपूर : खळबळजनक! पोलीस ठाण्यात आरोपीने चाकू स्वत:च्या पोटात…
Nagpur Police seized Rs 3 crore worth of stolen goods returning them to complainants
“तुमच्या घरातून चोरी झालेले दागिने सापडले…” पोलिसांनी ३ कोटींचा मुद्देमाल…
Man robbed near Pune railway station
पुणे स्टेशन परिसरात नशेबाज चोरट्यांची दहशत; पैसे देण्यास नकार दिल्याने एकावर ब्लेडने वार

हेही वाचा… नागपूर: आदासा मंदिर समितीचा नवा प्रयोग; आता पूजेचे साहित्य टोकण पद्धतीने

कपाटातून अंदाजे ३ लाख ४ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरी करून पसार झाला. रविवारी सायंकाळी शेजारी राहणाऱ्या चौधरी यांना त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी याबाबत व्यंकट यांना माहिती दिली. व्यंकट तत्काळ घरी आले आणि नियंत्रण कक्षाला माहिती दिली. हुडकेश्वर पोलीस घटनास्थळावर पोहोचले. पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Story img Loader