लोकसत्ता टीम
वाशीम : मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा परीसरातील जऊळका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दुबळवेल येथील कुलस्वामिनी जगदंबा माता मंदिरात शनिवारच्या रात्री चोरीची घटना घडली. चोरट्याने देवीच्या आंगावरील सोने, चांदीचे दागिने आणि दानपेटीतील रक्कम लंपास केली आहे.
दुबळवेल येथील जगदंबा माता मंदिर अत्यंत रमणीय ठिकाण असून गावाच्या पूर्वेकडील टेकडीवर हे सुंदर मंदीर बांधलेले आहे. दुबळवेल येथील गावकऱ्यासोबतच परीसरातील भाविक भक्तांची ही कुलस्वामिनी आराध्य दैवत म्हणून प्रसिद्ध आहे. नवरात्रोत्सवात येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते तसेच प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी अष्ठमी व नवमीला या मंदिरात भाविक भक्तांची मोठी गर्दी असते.
आणखी वाचा-‘आरटीई’ची सोडत काढूनही माहिती राखून ठेवली, आता प्रतीक्षा १२ जूनची; कुणाला कुठली शाळा…
भाविक भक्त येथे श्रध्देने दान पेटीत दान अर्पण करतात. याच कुलस्वामिनी जगदंबा मातेच्या मंदिरात शनिवारच्या रात्री चोरट्यांनी चोरी केली असून दानपेटीतील पैश्यासोबतच देवीच्या अंगावरील आभुषणे व चोने चांदीचे दागिने चोरून नेली. चोरीची घटना मंदिरातील सीसीटीव्हीत कैद झाली असून जऊळका पोलीसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.