नागपूर: महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी प्रवेशासाठी ‘कॅप राऊंड’द्वारे प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. अभियांत्रिकी प्रवेशासाठी ‘हिंदी अल्पसंख्याक’ कोटा आहे. त्यात हिंदी पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक आहे. मात्र, ‘हिंदी अल्पसंख्याक’ कोट्यात गैर हिंदी पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांची नावे असल्याचे समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेष म्हणजे, ‘हिंदी अल्पसंख्याक’ कोट्यातील प्रवेशासाठी काही नावे ही ‘सीईटी सेल’कडूनच येत असल्याने महाविद्यालयांना या जागेवर गैर हिंदी भाषिक विद्यार्थ्यांनाही प्रवेश द्यावा लागला, असा धक्कादायक आरोप महाविद्यालयांनी केला आहे.

हेही वाचा… अकोला : जि.प. पदभरतीत परीक्षा शुल्काच्या नावावर उमेदवारांची लूट, ‘वंचित’ने मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

राज्यभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. महाविद्यालयातील जागा महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या ‘कॅप राऊंड’द्वारे भरल्या जात आहेत. मात्र ‘कॅप राऊंड’मध्ये सादर करण्यात येत असलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीत निष्काळजीपणामुळे पात्र विद्यार्थ्यांच्या हक्कावरही गदा येत आहे.

हेही वाचा… राज्यात १० ऑगस्टपर्यंत कुठेही तीव्र हवामानाचा इशारा नाही

अभियांत्रिकी प्रवेशामध्ये ‘हिंदी अल्पसंख्याक’ कोटा असतो. यातील प्रवेश हे महाविद्यालय स्तरावर होत असले तरी यामध्ये केवळ हिंदी भाषिकांनाच प्रवेश देणे बंधनकारक असते. कमी टक्केवारी असणाऱ्या हिंदी भाषिकांना येथे प्रवेश दिला जातो. शुल्कामध्येही दिलासा मिळत असल्याने विद्यार्थी ‘हिंदी अल्पसंख्याक’ कोट्यामध्ये प्रवेशाची वाट पाहत असतात. मात्र, यामध्ये पात्र उमेदवारांना डावलून गैर हिंदी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.

विद्यार्थी काय म्हणतात?

एका नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनीने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, तिला ‘कॅप राऊंड’द्वारे या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. तिला ‘हिंदी अल्पसंख्याक’ कोट्यातून प्रवेश घ्यायचा होता. पण महाविद्यालयाच्या यादीत तिचे नाव कुठेच नाही. तिच्या म्हणण्यानुसार, या यादीत अशा अनेक विद्यार्थ्यांची नावे आहेत जे हिंदी बोलत नाहीत. मात्र, यासंदर्भात महाविद्यालयाकडे चौकशी करूनही दिलासा मिळाला नाही. याउलट महाविद्यालयांनीच आरोप केला की, ‘सीईटी सेल’कडून येणाऱ्या यादीनुसार आम्हाला प्रवेश द्यावे लागतात.

‘हिंदी अल्पसंख्याक’ कोट्यामध्ये हिंदी पार्श्वभूमी असणाऱ्यांना प्रवेश देणे बंधनकारक असले तरी हे प्रवेश महाविद्यालयाच्या व्यवस्थापन स्तरावर होतात. त्यामुळे यावर आमचे पूर्ण नियंत्रण नसते. त्यांच्याकडून केवळ अंतिम यादी जाहीर केली जाते. – डॉ. मनोज डायगव्हाणे, विभागीय सहसंचालक, तंत्र शिक्षण विभाग.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There are names of students of non hindi background in the hindi minority quota dag 87 dvr
Show comments